जळगावताज्या बातम्याशालेयसामाजिक
‘गुरुजी’ चित्रपटातून संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना मिळाली शिक्षणाची प्रेरणा

जळगाव (प्रतिनिधी) : शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना ‘गुरुजी’ हा शैक्षणिक चित्रपट दाखविण्यात आला. या चित्रपटातून शिक्षणाची आवड, जिद्द आणि अडचणींवर मात करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली. चित्रपटात आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या संघर्षमय पण प्रेरणादायी शिक्षणप्रवासाचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी हा चित्रपट मोठ्या उत्साहात पाहून त्यातील संदेश आत्मसात केला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक, पर्यवेक्षिका शितल कोळी तसेच कार्यक्रमाचे संयोजक दिप्तेश सुलक्षणे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडले.




