राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात आंतर विभागीय पुरुष व महिला नेटबॉल स्पर्धा उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव, एरंडोल, धुळे व नंदुरबार या चार विभागांच्या आंतर विभागीय पुरुष व महिला नेटबॉल स्पर्धा झाल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक व उपनगराध्यक्ष ॲड.रोहन मोरे होते.
व्यासपीठावर उद्घाटक नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रमुख अतिथी भाजप तालुकाध्यक्ष अतुल पवार यांच्यासह विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.पी.बोरसे, डॉ.अजय पाटील, निवड समिती सदस्य डॉ.राजेश सोनवणे, डॉ.नितीन वाळके तसेच डॉ.हटकर, डॉ.भालचंद्र मोरे, डॉ.नरेश बागल, डॉ . देवदत्त पाटील, डॉ.अरविंद कांबळे, डॉ.चाळसे, डॉ.हर्ष सरदार, डॉ.आर.बी.नेरकर, डॉ.के.डी.अहिरराव, डॉ.डि.एच.राठोड, डॉ.एस.बी.सावंत, विविध महाविद्यालयांचे क्रीडा संचालक उपस्थित होते.
प्रास्ताविक उपप्राचार्य व क्रीडा संचालक डॉ.एस.बी.भावसार यांनी केले. एरंडोल विभाग सचिव डॉ.शैलेश पाटील यांनी विभागीय स्पर्धेची माहिती दिली. अतुल पवार यांनी खेळाचे महत्त्व सांगितले. प्राचार्य डॉ.व्हि.आर.पाटील यांनी विद्यापीठाने विभागीय स्पर्धेची संधी दिल्याबद्दल तसेच यापुढे देखील विविध स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी क्रीडा संकुलाचे काम लवकर झाल्यावर खेळाडूंना विविध प्रकारच्या खेळांचा सराव करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे व महाविद्यालय अनेक स्पर्धांचे यशस्वी आयोजन करत असल्याचे कौतुक केले.
अध्यक्षीय मनोगतात ॲड.रोहन मोरे यांनी तंत्रज्ञानाच्या युगात खेळाचे महत्त्व अधोरेखित असून मैदानावर खेळाडूंची संख्या व विविध प्रकारच्या खेळांसाठी महाविद्यालय प्रयत्नशील असून भविष्यात देखील जास्तीत जास्त साहित्य उपलब्ध करून खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिली जाईल, असे नमूद करून स्पर्धा यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. एकूण चार विभागांच्या प्रत्येकी पुरुष व महिला अशा चार एकूण आठ मॅचेस झाल्या.
शेवटी पुरुष व महिला विजेते धुळे विभाग तर उपविजेतेपद एरंडोल विभाग पुरुष व महिला संघ. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जे.बी.पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.एम.आर.करंजे यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.




