ताज्या बातम्याजळगावधार्मिक

संत गजानन महाराज मंदिरात शनिवारी भागवत कथा सप्ताहाचे आयोजन

प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : येथील मोहाडी रोडवरील जीवनमोती सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील श्री संत गजानन महाराज मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात शनिवार ३१ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता ज्येष्ठ संचालक ॲड. बाबासाहेब दप्तरी व बाळासाहेब वडनेरे यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक व आरती करण्यात येणार आहे.

दुपारी ४ ते ७ या वेळेत दीपा तापडिया व त्यांच्या सहकाऱ्यांचा सुंदरकांड कार्यक्रम आणि संध्याकाळी साडेसात वाजता मंदिराचे अध्यक्ष अरुण सोनवणे व जीवन मोती सोसायटीचे अध्यक्ष मधुकर पाटील यांच्या हस्ते सपत्नीक आरती करण्यात येणार आहे. चिमुकले राम मंदिराचे ह.भ.प.दादामहाराज जोशी यांचा रविवार १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी पर्यंत श्रीमद भागवत कथा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. कथेची वेळ दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य शोभा यात्रा परिसरात आयोजित करण्यात आली आहे. रविवार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेपाच ते सात या वेळेत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त अकरा पूरोहितांद्वारे अभिषेक, आरती होणार आहे. रविवारी सकाळी १० वाजता भागवत कथा सप्ताह निमित्त काल्याचे किर्तन होणार आहे.

दुपारी साडेबारा वाजता आरती व महाप्रसाद आणि संध्याकाळी पाच ते सात या वेळेत स्वरांजली ग्रुपतर्फे भक्ती गीत व भावगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता आरती व रात्री आठ ते दहा या वेळेत महाप्रसादाचे वितरण होणार आहे. सर्व कार्यक्रम व भागवत कथा सप्ताहास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज बहुउद्देशीय ट्रस्टच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button