
मुख्य आरोपीसह तीन दुचाकी हस्तगत
अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अमळनेर पोलिसांनी या दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, मुख्य आरोपी अरबाज शेख साजीद मनियार (वय-२८, रा. धुळे) याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अरबाजला पकडले. त्याने अमळनेरसह इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. आरोपीने चोरलेल्या मोटारसायकली धुळे शहरात लपवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी धुळ्यात जाऊन खालील तीन मोटारसायकली जप्त केल्या:
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल असा
• हिरो स्पलेंडर प्लस (MH19-EJ5439): अंदाजे किंमत ₹३०,०००
• सुझुकी अक्सेस १२५ (MH18BY6692): अंदाजे किंमत ₹५०,०००
• सुझुकी अक्सेस १२५ (MH39AN8269): अंदाजे किंमत ₹५०,०००
• एकूण ₹१,३०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.




