ताज्या बातम्याजळगाव

प्रशासनाच्या तत्परतेमुळे धामोडी–शिंगाडी–शिवरस्ता हद्दीतील शेत रस्त्याचे प्रश्न मार्गी, उपोषण मागे

धामोडी, ता. रावेर (प्रतिनिधी) : धामोडी–शिंगाडी–शिवरस्ता हद्दीतील शेत रस्त्याच्या मोजणी, सीमांकन व रस्ता मोकळा करून मिळावा, या मागणीसाठी धामोडी येथील शेतकरी जगन्नाथ किसन मेढे यांनी तहसील कार्यालय, रावेर येथे दि. 27 जानेवारी 2026 रोजी सकाळी उपोषण सुरू केले होते. प्रशासनाच्या वेगवान, संवेदनशील व सकारात्मक भूमिकेमुळे दुपारी उपोषण यशस्वीरीत्या मागे घेण्यात आले.

महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेत रस्ता चळवळीचे राज्य समन्वयक माननीय दादासाहेब जंगले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रावेर तहसीलचे निवासी तहसीलदार माननीय आर. डी. पाटील साहेब यांच्या संवेदनशील व सकारात्मक भूमिकेमुळे आजचा प्रश्न मार्गी लागला.

भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक तडवी साहेब, शिरस्तेदार गिरी साहेब, मोजणी कर्मचारी भूकंप सोनवणे साहेब तसेच महसूल कर्मचारी प्रतीक सोनवणे यांनी दाखवलेल्या तत्पर सहकार्य, समन्वय व प्रभावी हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले गेले.

भूमी अभिलेख कार्यालय व तहसील प्रशासन यांनी समन्वय साधत शेतकऱ्यांच्या समस्या सविस्तर ऐकून घेतल्या व त्यावर तातडीची कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन दिले. तसेच तालुक्यातील प्रलंबित शिव पाणंद व शेत रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच नियोजित कालबद्ध कार्यक्रमानुसार विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली.

प्रशासनाकडून मिळालेल्या या सकारात्मक प्रतिसादामुळे व सहकार्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले. या संपूर्ण प्रक्रियेत दाखवलेल्या संवेदनशीलता, सकारात्मक दृष्टिकोन व सहकार्याबद्दल शेतकरी बांधवांच्या वतीने तहसील प्रशासन, भूमी अभिलेख विभाग व सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी शिव पानंद शेत रस्ते चळवळ कृती समिती रावेर सदस्य सचिन चौधरी, हरलाल पाटील, शंकरराव पाटील, तसेच भाजप तालुकाध्यक्ष दुर्गादास पाटील, योगेश पाटील, अरुण मेढे, जगदीश पाटील, राहुल जैन, विनोद मेढे यांच्यासह अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button