अभिवादनजळगावताज्या बातम्या

केऱ्हाळा बुद्रुक येथील ‘स्वामी व समृद्धी इंग्लिश मीडियम स्कूल’मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

रावेर (प्रतिनिधी) : येथील स्वामी प्री-प्रायमरी आणि समृद्धी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये २६ जानेवारी २०२६ रोजी ‘गणतंत्र दिवस’ मोठ्या उत्साहात आणि देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदा अमोल पाटील होत्या. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका जॉन्सी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

ध्वजारोहणानंतर शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगणारी प्रबोधनात्मक भाषणे सादर केली. मुख्याध्यापिका जॉन्सी मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व सांगत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याच कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘MAC’ आणि ‘नॅशनल लेव्हल आर्ट कॉम्पिटिशन’ मधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक योगेश्वर चौधरी व विलास महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सूत्रसंचालन आकांक्षा महल्ले व वैशाली पाटील यांनी केले. ध्वजसंचलनाचे नेतृत्व विलास महाजन यांनी केले, तर उपस्थितांचे आभार भारती महाजन यांनी मानले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होऊन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सोहळा पार पडला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button