ताज्या बातम्याअभिवादनजळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा!

माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण; विद्यार्थ्यांची जोशपूर्ण कवायत

जळगाव (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक तथा संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक हे होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.


यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेली शिस्तबद्ध व जोशपूर्ण सामूहिक कवायत सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. तसेच विद्यार्थी शिक्षक विद्यार्थी यांनी असाक्षर मुक्त गाव करण्यासाठी घेतली.


कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक, संचालक भागवत सानप, एकनाथ वंजारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल कोळी यांनी केले तर पर्यवेक्षक निलेश पवार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button