
जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईटतर्फे मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे आचार्य सचिन पाटील यांचे आओ लोट चले रोगमुक्त जीवन की और या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष संदीप झंवर, सचिव धर्मेश भैय्या यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्याख्यानात बोलताना आचार्य सचिन यांनी निरोगी जीवनासाठी मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सकारात्मक असणे गरजेचे आहे. कारण संपूर्ण शरीरात होणाऱ्या जैव रासायनिक क्रियांवर मनातील विचार आणि भावनांचे नियंत्रण असते असे सांगितले.
त्यांनी चांगली दिनचर्या, पचनक्रिया, भोजन, पाणी कधी किती प्यायला पाहिजे याविषयी पॉवर पॉईंट साजरीकरणातून माहिती देत समजावून सांगितले.
आभार डॉ. प्रतिभा कोकांडे यांनी मानले. व्याख्यानास ५७ रोटरी सदस्यांची उपस्थिती होती.




