आरोग्यजळगावताज्या बातम्यायोजनाशासकीय

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी व प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी प्रसिद्ध सेने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गुरुवार, दिनांक 22 जानेवारी रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील गालापूर पाचोरा तालुक्यातील वडगाव करे व जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे या अभियाना अंतर्गत सोनाली कुलकर्णीच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

चला ग्रामपंचायत सुरू असलेल्या डिजिटललायझेशन तसेच जलतारा शोष खड्डे व विविध लोकोपयोगी उपक्रमांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाल करणवाल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकडे यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील या तिन्ही गावांमध्ये सोनाली कुलकर्णी चे वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात उस्फुर्त असे स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी दिलेली दाद पाहून सोनाली भारावून गेले यावेळी गावकऱ्यांना समृद्ध पंचायत राज अभियानात उस्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

घोडा गाडीतून निघाली मिरवणूक
एरंडोल तालुक्यातील गालापूर येथे सोनाली कुलकर्णी हिची घोडा गाडीतून उस्फुर्त अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यासोबतच शाळकरी विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकामार्फत रेडियम खेळत स्वागत करण्यात आले.

विकासाची वाटचाल पाहून भारावली सोनाली
जिल्ह्यातील या तिघेही ग्रामपंचायत यांना भेटी दिल्यानंतर तेथील ग्रामपंचायतीने विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल पाहून सोनाली अक्षरशा भारावून गेली. यावेळी तिने जिल्ह्यातील ग्रामपंचायत उस्फुर्त असे कौतुक केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांचे सोनाली येणे आभार मानले.

या कार्यक्रमादरम्यान जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे सोनाली कुलकर्णी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते घरकुलचे लाभार्थी, तसेच धुरमुक्त गाव लाभार्थी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी गर्भवती मातांना महिला बालकल्याण विभागामार्फत किटचे वाटप देखील करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button