क्राईमजळगावताज्या बातम्याशासकीयसमस्या

जळगावात हुडको परिसरातील कुंटणखान्यावर छापा!

३ आरोपींना अटक, ४ पीडित महिलांची सुटका

जळगाव (प्रतिनिधी) : रामानंद नगर हद्दीतील पिंप्राळा परिसरातील हुडकोकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर दि.१९ रोजी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी चार पीडित महिलांची सुटका केली असून, तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ आणि त्यांच्या पथकाने खात्री करून ही कारवाई केली. छाप्यात वेश्या व्यवसायासाठी लागणारे साहित्य आणि रोख रक्कम देखील हस्तगत करण्यात आली आहे. कारवाईत छाया पितांबर बैरागी (रा. कुंभारवाडा पिंप्राळा, जळगाव), कल्पेश राजपुत (रा. दादावाडी, जळगाव), आणि जयराम संतोष वंजारी (रा. किनगाव, ता. यावल, जि. जळगाव) यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलांना आशादीप वसतिगृहात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास पोउपनि संजय तडवी हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button