ताज्या बातम्याजळगावशैक्षणिक

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकदिवसीय कार्यशाळा

जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि लेवा एज्युकेशनल युनियन संचलित डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम-उषा अंतर्गत “Workshop on NEP for Stakeholders” या विषयावर दिनांक १६ जानेवारी रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदी, त्यांची अंमलबजावणी आणि त्यातून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व पालकांना होणारे फायदे याविषयी व्यापक जागरूकता निर्माण करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. कार्यशाळेच्या सुरवातीला प्रा. ऐश्वर्या परदेशी यांनी महाविद्यालयीन गीत सादर केले. उद्घाटन समारंभात प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. पी. एन. तायडे यांनी केले. प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे उच्च शिक्षणात निर्माण होणाऱ्या गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख संधींचा सविस्तर आढावा घेतला. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. व्ही. जे. पाटील यांनी एनईपीमुळे शिक्षण व्यवस्थेत होणारे आमूलाग्र बदल, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धती आणि संशोधनाला मिळणारी चालना यावर प्रकाश टाकला.

कार्यशाळेतील पहिल्या सत्रात डॉ. प्रियंका बऱ्हाटे यांनी भारतीय ज्ञानपरंपरा (IKS) व व्हॅल्यू-बेस्ड स्किल कोर्सेस (VSC) यांचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट केले. दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. केतन नारखेडे यांनी Internship व OJT (On-the-Job Training) च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये कशी विकसित होतात, याचे सखोल विश्लेषण केले. तिसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ. के. जी. कोल्हे यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील बदल आणि एनईपीचे दीर्घकालीन महत्त्व स्पष्ट करत बहुविषयक शिक्षण पद्धतीवर भर दिला.

सक्रिय सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप
दुपारनंतरच्या सत्रात प्रा. डॉ. श्रीकांत चौधरी यांनी MOOC’s Courses संदर्भात मार्गदर्शन करत ऑनलाइन शिक्षणाच्या वाढत्या संधी स्पष्ट केल्या. समारोप सत्रात कार्यशाळेचा आढावा घेण्यात आला. समारोप सत्राचे अध्यक्ष म्हणून रसायनशास्त्र विषयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. ए. एम. नेमाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे प्रतिनिधिक मनोगत झाले तसेच कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

मान्यवरांनी केले मार्गदर्शन
कार्यशाळेचे समन्वयक म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. पी. एन. तायडे यांनी काम पाहिले. कार्यशाळेच्या नियोजन आणि आयोजनात उपप्राचार्य प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वितेसाठी डॉ. सचिन कुंभार, डॉ. मिताली अहिरे, डॉ. राणी त्रिपाठी, प्रा. शांताराम तायडे, प्रा. नयना मराठे, प्रा. ऐश्वर्या वाणी, प्रा. अमृता नेतकर, प्रा. तकदीश शेख, प्रा. योगिता सोनवणे, प्रा. मंगेश किनगे, प्रा. निलेश कोळी, डॉ. गणेश जेठवे, प्रा. सुनील अहिरे. प्रा. ज्योती भोई, डॉ. नयन माहेश्वरी, प्रा. प्रियांका आठे, प्रा. नेहा खरे, प्रा. कल्पना खेडकर, प्रा. शुभांगी जाधव, प्रा. करण थोरात, प्रा. उत्कर्ष पुण्यशील इ. यांनी प्रयत्न केले. सदर कार्यशाळेमुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी सर्व भागधारकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन व सखोल समज निर्माण झाली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button