जळगावनिवडपुरस्कार

सर्वोत्कृष्ट मानद सचिव पुरस्काराने डॉ. अनिता भोळे यांचा दुहेरी गौरव

जळगाव (प्रतिनिधी) : येथील आयएमएच्या पहिल्या महिला मानद सचिव डॉ. अनिता भोळे यांचा आयएमए राष्ट्रीय अध्यक्ष प्रशंसा अर्थात सर्वोत्कृष्ट मानद सचिव व बिग ब्रँच बेस्ट सेक्रेटरी या दोन पुरस्काराने गौरव करण्यात आला. अहमदाबाद येथे आयएमएच्या शंभराव्या वार्षिक परिषदेत या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या वर्षी डॉ. भोळे यांच्या नेतृत्वात जळगाव आयएमएने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोलापूर येथे झालेल्या सोहळ्यात राज्य अध्यक्षांतर्फे बिग ब्रँच बेस्ट सेक्रेटरी म्हणून डॉ. अनिता भोळे यांना गौरविण्यात आले. त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल आयएमएचे डॉ. अनिल पाटील, डॉ. विलास भोळे, डॉ. स्नेहल फेगडे, अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे, मानद सचिव डॉ. भरत बोरोले व सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी अभिनंदन केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button