आरोग्यजळगावताज्या बातम्याशासकीय

जळगाव शासकीय वैद्यकीय रुग्णालयाची ओपीडी रविवारी राहणार सुरु!

प्रजासत्ताक दिनाच्या सुटीच्या पार्श्वभूमीवर कामकाजात बदल

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने आगामी प्रजासत्ताक दिनाच्या सुटीच्या पार्श्वभूमीवर बाह्यरुग्ण विभागाच्या (OPD) कामकाजात बदल केले आहेत. या संदर्भात वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाने एक परिपत्रक जारी केले असून सोमवार, दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची शासकीय सुटी असल्यामुळे रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

नियमित सेवा कधीपासून?
२६ जानेवारीच्या सुटीची भरपाई म्हणून, त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजेच २५ जानेवारी २०२६ (रविवार) रोजी, बाह्यरुग्ण विभाग सुरु ठेवण्यात येणार आहे. रुग्णांनी रविवारच्या दिवशी ओपीडी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे. दिनांक २७ जानेवारी २०२६ (मंगळवार) पासून रुग्णालयातील बाह्यरुग्ण ओपीडी सेवा पुन्हा नियमितपणे सुरु होईल, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी, त्यांनी या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button