आरोग्यजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रशासकीय

जळगाव जिल्हा परिषदेच्या ४ दिव्यांग कर्मचाऱ्यांचे निलंबन!

तपासणीत प्रमाणपत्रात आढळली मोठी तफावत

जळगाव (प्रतिनिधी) : राज्यातील दिव्यांग कर्मचारी आणि व्यक्तींच्या प्रमाणपत्रांची सखोल तपासणी करण्याची मोहीम सध्या राज्य शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्हा परिषदेतील चार कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारीत मोठी तफावत आढळून आली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी संबंधित चारही कर्मचाऱ्यांवर बुधवार, १४ जानेवारी रोजी निलंबनाची कारवाई केली आहे.

या कर्मचाऱ्यांचे झाले निलंबन:
१. भालचंद्र नारायण पवार –
आरोग्य सहाय्यक, जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जळगाव.
२. छाया घनश्याम भोळे – आरोग्य सहाय्यिका, प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोड.
३. संदीप विनायक सोनवणे – आरोग्य सेवक, प्राथमिक आरोग्य केंद्र, तरवडे (ता. चाळीसगाव).
४. गणेश मुरलीधर महाजन – आरोग्य सहाय्यक, प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपरखेड (ता. भडगाव).

नेमके प्रकरण काय?
राज्य शासनाच्या आदेशानुसार दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या ‘UID’ कार्डची आणि मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी केली जात आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान वरील चारही कर्मचाऱ्यांनी सादर केलेली दिव्यांगत्वाची टक्केवारी आणि प्रत्यक्षात तपासणीत आढळलेली टक्केवारी यात मोठी तफावत दिसून आली. यामुळे या कर्मचाऱ्यांनी शासनाची फसवणूक केल्याचे प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न झाले आहे.

कारवाईचा बडगा सुरूच:
यापूर्वी देखील दिव्यांग प्रमाणपत्रात तफावत आढळल्याने जिल्हा परिषदेच्या इतर चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा चार कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याने जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे. जे कर्मचारी या तपासणीत दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button