
मॅक्सवेल अकॅडमीच्या संचालकांचा स्तुत्य उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : स्थानिक श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये नुकताच एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. मॅक्सवेल अकॅडमीचे संचालक आशिष कुमार पाठक यांनी स्व.काशिनाथ पाठक जी यांच्या स्मरणार्थ शाळेला १०१ किलो तांदळाचे वाटप केले.
या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. समाजातील गरजू घटकांना मदत करण्याच्या या भावनेमुळे पाठक यांच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी आशिष कुमार पाठक यांचे मनःपूर्वक आभार मानले. “समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून अशा प्रकारचे उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे,” अशा शब्दांत नाईक यांनी त्यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.




