
पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती
रावेर (प्रतिनिधी) : स्वामी प्री-प्रायमरी व समृद्धी इंग्लिश मीडियम स्कूल, के-हाळे, ता. रावेर येथे शालेय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात पार पडले. या कार्यक्रमास पालक, विद्यार्थी, शिक्षकवर्ग व प्रमुख मान्यवर म्हणून रावेरचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जैस्वाल यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागतगीताने करण्यात आली. समृद्धी फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील व स्वामी परिवाराचे अध्यक्ष रविंद्र पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणासोबत संस्कार व कलागुणांचे महत्त्व अधोरेखित केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका जोन्सी थॉमस यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांनी सादर केलेली विविध 23 नृत्य कार्यक्रम शिकविलेले होते. या सर्व विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची संकल्पना आकर्षक असून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे उत्तम दर्शन घडले.
पालकांकडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकवर्गाच्या प्रयत्नांचे कौतुक करून सन्मान करण्यात आला. सुत्रसंचालन वैशाली पाटील व आकांक्षा महल्ले यांनी केले. तर शेवटी आभार मिलिंद पाटील यांनी मानले.




