कलाकारक्रीडाजळगावताज्या बातम्याशैक्षणिक

राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात वार्षिक ‘वसंतोत्सवा’चे उत्साहात उद्घाटन

पारोळा (प्रतिनिधी) : येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात ‘वसंतोत्सवा’चे उद्घाटन अत्यंत उत्साही आणि चैतन्यमय वातावरणात पार पडले. या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.योगिता पाटील (झेड‌.बी‌.पाटील महाविद्यालय, धुळे) यांच्या हस्ते झाले. सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. तसेच तुळशीला जल अर्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक व उपनगराध्यक्ष ॲड.रोहन मोरे, संध्या मोरे, रोहिणी मोरे, नंदा पवार उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्हि.आर.पाटील यांनी भूषवले.

प्रसंगी उपप्राचार्य डॉ.एस.बी.भावसार, डॉ.जी.पी.बोरसे, डॉ.अजय पाटील, डॉ.वंदना पाटील,प्रा.पी.पी. पाटील, स्नेहसंमेलनाध्यक्ष वरिष्ठ विभाग प्रा.प्रतिभा पाटील, कनिष्ठ विभाग, प्रा.सीमा साळुंखे, शिवाजी पाटील उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा.प्रतिभा पाटील,प्रा.सीमा साळुंखे यांनी केले त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख मांडला.

प्रसंगी संचालक ॲड.रोहन मोरे यांचा उपनगराध्यक्ष झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.व्हि.आर‌.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपनगराध्यक्ष ॲड.रोहन मोरे यांनी स्नेहसंमेलन हे विद्यार्थी जीवनातील अनमोल ठेवा असून स्नेहसंमेलनाचा मनमुराद आनंद लुटा व भविष्यातील चांगले यश गाठण्याचा शुभेच्छा दिल्या.

प्राध्यापक यांचा पी.एच.डी.पदवी प्राप्त केल्याबद्दल, सहयोगी प्राध्यापक व प्रोफेसर पदी पदोन्नती झाल्याबद्दल, आदर्श शिक्षक, कार्यप्रवण , वृक्ष मित्र तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांना कार्य गौरव पुरस्कार देऊन तसेच विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी, आदर्श व गुणी खेळाडू पुरस्कार सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

डॉ.योगिता पाटील यांनी आपल्या मनोगतात मन्ही माय अहिराणी या विषयावर अहिराणी भाषेत ओघवत्या शैलीत खास विद्यार्थिंनींनी सामाजिक भान ठेवण्याचे व जपण्याचे आवाहन केले. तसेच अहिराणी भाषेत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन खिळवून ठेवले. त्यांनी अहिराणी भाषेत अनेक उदाहरणे देऊन सध्याची परिस्थिती कशी आहे याबद्दल विचार करायला भाग पाडले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.व्हि.आर.पाटील यांनी वर्षभरात महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा सादर केला व भविष्यातील महाविद्यालयाची प्रगतीसाठी कसे कार्यरत राहू व प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. यावर्षीच्या स्नेहसंमेलन महिला सशक्तिकरणासाठी असल्याने महिलांना संधी दिल्याचे नमूद केले. डॉ.डि.एच.राठोड यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सूत्रसंचालन प्रा.उज्वला नंदुरबारे,प्रा.भाग्यश्री घोंगाणे, डॉ.अजय पाटील, डॉ.संजय चव्हाण यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा‌.पी‌.पी.पाटील यांनी केले. बक्षीस वितरण समारंभासाठी प्रा.जे.बी.पाटील, प्रा.ए.ए.मोरे यांनी सहकार्य केले. यानंतर दुपारच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी चंद्रा लावणी ,एकल नृत्य, रिमिक्स ,समूह नृत्य,जोगवा,साऊथ रिमिक्स ,नारीशक्ती नाटिका सादर केले. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रविण कोळी, प्रा.योगिता पाटील ,प्रा.सोनल भोई यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button