
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची कल्पकता
भुसावळ, (प्रतिनिधी) : डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये, विद्यार्थ्यांनी एका अनोख्या आणि अर्थपूर्ण शुगर बोर्ड अॅक्टिव्हिटीमध्ये भाग घेत सर्जनशिलतेतून जंक फूड आणि कोल्ड्रिंक्सच्या हानिकारक परिणामांबद्दल जागरूकता करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला.
यासाठी सजीव देखाव्याचे सादरीकरण, रंगीबेरंगी शुगर बोर्ड डिस्प्ले आणि विचार करायला लावणार्या स्कीटद्वारे विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता दाखवत जंक फूड आणि एरेटेड कोल्ड्रिंक्स आपल्या आरोग्याला कसे हानी पोहोचवू शकतात आणि यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, दात किडणे आणि इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात याबाबत सादरीकरणाने एक संदेश दिला.
“निरोगी अन्न हे जंक फूड न्हवे तर खरे ऊर्जा वाढविणारे आहे.!”या घोषवाक्यासह उपक्रमातून विद्यार्थ्यांना निरोगी राहण्याच्या सवयी स्वीकारण्यास प्रोत्साहित केले. शाळेच्या प्रीन्सीपल अनघा पाटील यांनी विदयार्थ्यांच्या सर्जनशिलतेचे कौतुक केले या अनोख्या उपक्रमामूळे निश्चीतच लहानच नाही तर मोठयांना देखिल प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त केली
लसीकरणामुळे त्यांच्या आरोग्याचे संरक्षण होणार असून, रोगप्रसार रोखण्यास मदत होणार आहे. या शिबिरामध्ये डॉ. स्वरूप लिंगायत आणि व्रणोपचारक रघुनाथ इंगळे या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राण्यांना लसीकरण करून दिले. त्यांनी शिबिरात सक्रिय सहभाग घेत लसीकरणाचे महत्त्व गावकऱ्यांना समजावून सांगितले.
या उपक्रमाचे आयोजन ऐनपूर पशुसंवर्धन विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, प्रा. बी.एम. गोणशेटवाड व प्रा. व्ही.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत गौरव महालकर, सौरव महेर, पियुष नेहते, कुणाल सपकाळे, पुष्पराज शेळके यांनी ऐनपूर (ता. रावेर) येथे केले होते. या उपक्रमामुळे गावात प्राणी आरोग्याबाबत जनजागृती वाढली असून, भविष्यात असे उपक्रम वारंवार व्हावेत अशी ग्रामस्थांची इच्छा आहे.