राज्यात Doppler Weather RADAR Network Installation मध्ये येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी बैठक

जळगाव (प्रतिनिधी) : राज्यात भारतीय हवामान खात्यामार्फत (IMD) छत्रपती संभाजीनगर, परभणी, रत्नागिरी व जळगाव येथे प्रस्तावित Doppler Weather RADAR Network Installation प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभाग व यंत्रणांची बैठक आयोजित करण्यात आली.
सदर बैठकीत जळगाव जिल्ह्यातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे Doppler Weather RADAR Network उभारणीसंदर्भात आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत जागेची उपलब्धता, फेज विद्युत जोडणी, मुबलक पाणीपुरवठा व्यवस्था, इंटरनेट व दुरध्वनी सुविधा वरील सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून आवश्यक कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कामकाज करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी, बांधकाम विभाग प्रमुख, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील अधिकारी उपस्थिती होते. Doppler Weather RADAR Network मुळे हवामान अंदाज अधिक अचूक होऊन आपत्ती व्यवस्थापन, शेती, जलसंपदा व नागरिक सुरक्षा या क्षेत्रांना मोठी मदत होणार आहे.




