
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने घेतलेल्या प्रथम वर्ष डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या परीक्षेत गोदावरी पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून महत्त्वाचे यश मिळविले आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग विभाग मध्ये वृषिका माहुरकर यांनी एकूण ९४.२२% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.तसेच गणितात १०० पैकी १०० गुण मिळवून अतुलनीय कामगिरी केली आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग मध्ये ललित जितेंद्र पाटील यांनी एकूण ८७.८८% गुण मिळवून प्रथम क्रमांक संपादन केला. तसेच गणित मध्येही १०० पैकी १०० गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य, व्यवस्थापन, शिक्षक व शिक्षणतत्पर कर्मचारी वर्ग यांच्या वतीने सर्व टॉपर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येते आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.




