जळगावताज्या बातम्यानिवडणूकराजकारण

नितीन लड्डा यांच्या विजयासाठी भाजपची ताकद वाढली!

अपक्ष उमेदवार अनिल पगारिया यांचा बिनशर्त पाठिंबा

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, अपक्ष उमेदवार अनिल पगारिया यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार नितीन भाऊ लड्डा यांना आपला जाहीर आणि बिनशर्त पाठिंबा घोषित केला आहे. या निर्णयामुळे महायुतीची बाजू अधिक भक्कम झाली असून निवडणुकीच्या मैदानात लड्डा यांचे पारडे जड झाले आहे.

अनिल पगारिया यांनी आपल्या पाठिंब्याचे अधिकृत पत्र जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी पगारिया यांनी शहराच्या विकासासाठी आणि महायुतीच्या विजयासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

या प्रसंगी भाजपचे उमेदवार नितीन भाऊ लड्डा, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख विष्णू भाऊ भंगाळे, भाजप जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, राहुल वाघ, पितांबर भावसार यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनिल पगारिया यांच्या पाठिंब्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आता सर्व शक्तीनिशी नितीन लड्डा यांच्या प्रचारात उतरण्याचा निर्धार महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button