
चोरीच्या तीन दुचाकी केल्या हस्तगत
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरात दुचाकी चोरट्यांनी मोठा धमाका घातला असून रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने दोन चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी रामानंद पोलीस स्टेशन हद्दीतील तीन चोरी झालेल्या दुचाकींना हस्तगत केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामानंद नगर हददीत दि.२ जानेवारी रोजी किरण मधुकर सुर्व (रा. मारोती पार्क शिव कॉलनी) यांची रु.60,000 रु. किमतीची काळया रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकी (क्र.MH-19-AY-1797) पिंप्राळा बाजारात चोरी झाली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरु करण्यात आला. दरम्यान, रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन विक्की नंदलाल भालेराव (वय-२९ रा.शंकर आप्पा नगर पिंप्राळा जळगाव) व महेश राजेंद्र मेढे (वय-२३ रा.रामेश्वर कॉलनी जळगाव) या दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीदरम्यान, दोघांना गुन्ह्याची तसेच जिल्हा पेठ पोस्टेस दाखल गुन्हयातील हिरो स्प्लेंडर प्रो तसेच एक हिरो डिल्क्स अशा एकुण ३ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यावरुन दोघांकडून एकूण ३ दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे तसेच जितेंद्र राजपुत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, योगेश बारी यांनी केली. पुढीत तपासा पोनि राजेंद्र गुंजाळ यांचे आदेशान्वये पोह जितेंद्र राजपुत हे करीत आहेत.




