
जामनेरला वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेतर्फे विद्यार्थी सत्कार
जामनेर, (प्रतिनिधी) : आपल्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी विरंगना अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घेताना शैक्षणिक गुणवत्तेसह स्वतःच्या संरक्षणासाठी आवश्यक बाबीही आत्मसात कराव्यात, असे प्रतिपादन श्री गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट चैतन्य धामचे संस्थापक अध्यक्ष श्याम चैतन्य महाराज यांनी केले.
येथील पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेतर्फे स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा साजरा करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात “तुम चलो, हम साथ हैं तुम्हारे, हर मोड़ पर सत्कार मिलेगा। बस लक्ष्य न भूलो जीवन का, एक दिन यश अपार मिलेगा !” या काव्यपंक्तीने केली. तर शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले, “सपनों को सच कर दिखाना है, खुद को दुनिया में चमकाना है। सत्कार नहीं बस शुरुआत है, अब तुम्हें सितारा बन जाना है !” असे मार्गदर्शन केले.
मान्यवरांची केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
प्रमुख अतिथी म्हणून जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांची उपस्थिती होती. याप्रसंगी विठ्ठल जाधव, बी.बी. धाडी, रोहिदास पवार, सुरेश जाधव, भारमल नाईक, पितांबर राठोड, विस्ताराधिकारी जामनेर पुखराज पवार, केंद्रप्रमुख गारखेडा, सिताराम पवार, मुख्याध्यापक पाचोरा अनारसिंग राठोड, विस्तार अधिकारी पाचोरा, भाजपा जिल्हा युवा अध्यक्ष निलेश चव्हाण, रमेश नाईक, तूकडू नाईक, प्राध्यापक इंदल जाधव, रामकिसन नाईक, भाईदास चव्हाण, उदल नाईक, नटवर चव्हाण, लालचंद चव्हाण या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी मनोगत व्यक्त केले.
यांचा झाला सन्मान
यावेळी महिला सदस्य म्हणून अंजूताई पवार, सविता राठोड, माधुरी नाईक, पितांबर राठोड, पुखराज पवार यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी सुमारे 50 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. त्यात विद्यार्थ्यांना ट्रॉफी मेडल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यशस्वीतेसाठी विठ्ठल जाधव, बन्सीलाल चव्हाण, खेमराज नाईक, रमेश चव्हाण, चिंतामण राठोड, प्रकाश चव्हाण, तुकाराम राठोड, अशोक पवार, महेंद्र नाईक, प्रदीप जाधव, उदयसिंग पवार, सुनील राठोड, अर्जुन चव्हाण, जवलसिंग राठोड, विनोद राठोड, कनक सिंग पवार यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक बन्सीलाल चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचलन खेमराज नाईक यांनी केले.