आर्थिकक्राईमजळगावताज्या बातम्यासमस्या

रावेर तालुक्यातील खिरवड येथे अनधिकृतरीत्या वाळूचे अत्खनन!

वाळू माफियांवर कारवाई करण्याची तहसीलदारांकडे मागणी

रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील मौजे खिरवड येथे अनधिकृतरीत्या जेसीबीच्या साहायाने वाळूचे अत्खनन करून ट्रॅक्टरव्दारे सुसाट वाळूची वाहतूक केली जात आहे. हे वाळू माफिया कुणालाही न जुमानत शासनाचा महसूल बुडवीत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रावेर तहसीलदार यांच्याकडे दिनांक २ जानेवारी रोजी करण्यात आली. कारवाई न झाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

राजकुमार खिरवडकर (रा. खिरवड, ह.मु.रावेर) यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे विश्वड, ता. रावेर येथील ग्रामपंचायत सदस्य प्रकाश तायडे व गावातील नेहेते, दोधे, अटवाडे, थेरोडे तसेच निंभोरेसीम येथे सुमारे २५ ते ३० ट्रॅक्टर असून ते रात्रीच्या वेळेस खिरवड येथील नदीपात्रात लागून असलेली गायरान शेतजमीन तसेच खाजगी मालक यांच्या शेतीमधून जेसीबी मशनरीच्या सहाय्याने रेतीचे अवैधरीत्या उत्खनन करून अवैध वाहतूक करीत असतात. या महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल करीत असून शासनाचा महसूल बुडवीत आहे.

वाळू माफियाकडून गावकऱ्यांना धमकी
या प्रकरणाला खिरवड, नेहते, दोधे, अटवाडे, थेरोडे व निंभोरासीम तलाठी जबाबदार असून याबाबत तहसील कार्यालयाकडे अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे वारंवार तक्रार केली आहे. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनकडेही तक्रारी केल्या आहेत. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून ठोस कार्यवाही झालेली नाही. गेल्या १५-२० दिवसापूर्वी प्रकाश तायडे यांचे ट्रॅक्टर पकडते गेले व ते एक-दोन तासाने सोडण्यात आले. त्यामुळे वाळू माफिया श्री तायडे यांची हिम्मत वाढलेली आहे. ते गावात कोणालाच जुमानत नाही कुणी जर त्यांचे विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही रेती माफिया आहेत ”आम्ही… कलेक्टर, तहसीलदार, प्रांत व पोलीस प्रशासन यांना जुमानत नाही” तर तुमच्या सारख्या लोकांना ट्रॅक्टर खाली तुडवून टाकू शकतो, अशी धमकी गावकऱ्यांना देतात.

याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित माफिया आणि त्याला साठी देणारे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी. तसेच त्यांच्यापासून माझ्या जीवितास धोका असून माझे जीविताचे बरेवाईट झाल्यास सर्व गावातील रेती माफिया जवाबदार राहतील, नोंद घ्यावी त्वरित माफियांचा बंदोबस्त करण्यात यावा. अन्यथा तहसीलदार कार्तायासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राजकुमार खिरवडकर यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button