आरोग्यजळगावताज्या बातम्यानिवडशैक्षणिक

मॅक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर येथे ‘रंगोत्सव 2025 उपक्रम’ उत्साहात

265 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; यशस्वी विद्यार्थ्यांना झाला गौरव

रावेर (प्रतिनिधी) : मॅक्रो व्हिजन स्कूल अकॅडमी, रावेर येथे रंगोत्सव (Drawing Art Competition) हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या स्पर्धेत शाळेतील एकूण 265 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली कला सादर केली. ही स्पर्धा प्री-प्रायमरी विभागापासून इयत्ता आठवीपर्यंत घेण्यात आली असून ही नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन होती.

जिथे शब्द अपुरे पडतात, तिथे चित्र बोलू लागते. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला रंग, रेषा आणि आकारांची जोड देत अत्यंत सुंदर व अर्थपूर्ण चित्रे साकारली. या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले. यशस्वी विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल तसेच काही विद्यार्थ्यांना ट्रॉफी व स्पेशल गिफ्ट्स देऊन गौरविण्यात आले.

मान्यवरांनी केले विध्यार्थ्यांना मार्गदर्शन
ड्रॉईंग आर्ट्स ही विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, निरीक्षणशक्तीला आणि आत्मविश्वासाला चालना देणारी कला असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास मोठी मदत होते, असे मत शाळेच्या मुख्याध्यापक जनार्दन धनगर यांनी व्यक्त केले. ‘लहान हातांनी काढलेली चित्रे मोठी स्वप्ने रंगवतात’, अशा शब्दात शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे व शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले.

या यशाबद्दल शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील, जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील तसेच शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक करत आनंद व्यक्त केला. तसेच शाळेचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले, डायरेक्टर विनायक पाटील आणि धनराज चौधरी यांनी सर्व विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button