जळगावताज्या बातम्यानिवडणूकमहाराष्ट्रराजकारण
मनपा निवडणूक: “युती” झाली पण… निष्ठावान इच्छुक उमेदवार नाराज!

आमदार सुरेश भोळे यांना घेराव, अनेकांचे अश्रू आणावर
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव मनपा निवडणुकीची रनधुमाळी सुरू झाली असून भाजप युती लढणार आहे. त्यामुळे भाजपतील अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांची तिकिटे कापली गेल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आपला रोष आमदार सुरेश भोळे यांच्याकडे व्यक्त केला असून यावेळी अनेकांचे अश्रू आणावर झाले.
मंगळवारी, ३० रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाने युतीची अधिकृत घोषणा केली. त्यानुसार या निवडणुकीत भाजपला ४६, शिवसेना २३ आणि राष्ट्रवादी ६ अशाप्रकारे जागांचे वाटप झाले आहे. यामुळे अनेक वर्षे प्रभागात काम करणाऱ्या कार्यकर्त्य नाराज झाले आहे. नाराजीचा सूर हा सर्वत्र दिसून येत असून त्यातील अनेक जण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे.




