
जळगाव (प्रतिनिधी) : गोदावरी फाउंडेशनचे गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग आयोजित राष्ट्रीय वेबिनार सिरीज २०२५ दिनांक २४ ते २८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने यशस्वीपणे पार पडली. आज या वेबीनारचा समारोप करण्यात आला. या पाच दिवसीय वेबिनार सिरीजमध्ये नर्सिंग क्षेत्रातील विविध विशेष शाखांवर देशभरातील मान्यवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात अत्याधुनिक तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, बालरोग, मानसिक आरोग्य, कम्युनिटी नर्सिंग, तसेच प्रसूती व स्त्रीरोग परिचर्येमधील नवीन प्रवाह व भविष्यकालीन संधी यावर सखोल चर्चा करण्यात आली.
वेबिनारचे ठळक मुद्दे
- मेंटल हेल्थ नर्सिंग (२४ नोव्हेंबर) : महामारीनंतर वाढलेल्या चिंताविकाराचे प्रभावी व्यवस्थापन.
- कम्युनिटी हेल्थ नर्सिंग (२५ नोव्हेंबर) : युद्धस्थिती किंवा संकटकाळातील नर्सची भूमिका व समुदायातील तयारी.
- मेडिकल सर्जिकल नर्सिंग (२६ नोव्हेंबर) : घालण्यायोग्य आरोग्य तंत्रज्ञान द्वारे रुग्ण व्यवस्थापनातील आधुनिक बदल.
- चाइल्ड हेल्थ नर्सिंग (२७ नोव्हेंबर) : भारतातील निओनॅटल नर्सिंगचे विकसित होणारे स्वरूप
- स्त्रीरोग नर्सिंग (२८ नोव्हेंबर) : मातृत्व व स्त्रीरोग सेवांमध्ये ए आय ची वाढती भूमिका.
प्रत्येक सत्राला देशभरातील विद्यार्थी, नर्सिंग व्यावसायिक व शिक्षक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सर्व सहभागींसाठी ई-सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले.महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सर्व तज्ज्ञ, सहभागी व सहकार्य करणार्या टीमचे आभार मानून आगामी काळात अशा शैक्षणिक उपक्रमांची मालिका राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.




