आंदोलनअभिवादनऐतिहासिककलाकारजळगावताज्या बातम्याशैक्षणिक

रोटरी वेस्टच्या शिवपर्व महोत्सवात स्पर्धकांनी साकारले १५ गड – किल्ले

जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टने आयोजित केलेल्या शिवदुर्ग महोत्सव पर्व -१ मध्ये शालेय विद्यार्थ्यांनी १२ तर खुल्या गटातील स्पर्धकांनी ३ गड-किल्ले साकार केले. युनोस्कोद्वारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड – कोट – किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत नामांकन घोषित झाल्याबद्दल मायादेवी नगरातील रोटरी भवनच्या प्रांगणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी मुरुड जंजिरा किल्ला, तोरणा गड, मुरुड गड, मल्हार गड, लोहगड, शिवनेरी किल्ला, प्रतापगड, पन्हाळा किल्ला तर विद्यार्थ्यांच्या चार समूहाने सिंधुदुर्ग किल्ला साकार केले. खुल्या गटातील स्पर्धकांनी परमदुर्ग रायगड किल्ला आणि प्रतापगड साकारले आहेत. रोटरी वेस्टचे अध्यक्ष गौरव सफळे यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शुभारंभ करण्यात आला.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी प्रकल्प सचिव देवेश कोठारी, प्रशासकीय सचिव महेश सोनी, प्रकल्प संकल्पना असलेले तुषार तोतला, प्रकल्प प्रमुख राहुल पवार यांच्यासह माजी अध्यक्ष कृष्णकुमार वाणी, सरिता खाचणे, प्रेसिडेंट इलेक्ट योगेश राका यांची प्रमुख उपस्थिती होती.

रोटरी गव्हर्नर इलेक्ट डॉ. राजेश पाटील व माजी अध्यक्ष नितीन रेदासनी यांनी स्पर्धा प्रदर्शनास भेट दिली. स्पर्धेचे परीक्षण इतिहास अभ्यासक महेश पवार आणि गड – किल्ले संवर्धक व अभ्यासक संतोष पाटील, डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले. स्पर्धकांना रोटरॅक्ट वेस्ट क्लबचे प्रतीक वाणी, प्रथमेश मिसार, मोक्षदा ओगले यांनी सहकार्य केले.

प्रदर्शन २७ डिसेंबरपर्यंत खुले

किल्ल्यांचे हे प्रदर्शन २७ डिसेंबरपर्यंत सर्व नागरिकांना पाहण्यासाठी खुले आहे. यानिमित्ताने शनिवार २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता रोटरी भवन येथे किल्ले रायगडचे जतन – संवर्धन करणारे वास्तु विशारद वरूण भामरे यांचे व्याख्यान व स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button