
जळगाव (प्रतिनिधी) : गोदावरी फाउंडेशन संचलित, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील अंतिम वर्ष यांत्रिक अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी “पूर्णपणे स्वयंचलित ऑर्डिनो संचालित सोलर पॅनल क्लिनर रोबो” हे नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे यशस्वी डिझाईन व निर्मिती केली आहे.
हा प्रकल्प प्रा. मयूर पी. ठाकूर आणि प्रा. किशोर एम. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला.तुषार पाटील, वैभव पाटील, यद्नेश ठाकरे आणि निरज नारखेडे या विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. सोलर पॅनलवर धूळ व मळ साचल्यामुळे निर्माण होणारी कार्यक्षमतेत घट होते.
त्यांनी तयार केलेला हा रोबो ऑर्डिनो प्रोग्रामिंगच्या सहाय्याने पूर्णपणे स्वयंचलित आहे, जो कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय सोलर पॅनल स्वच्छ करतो, आणि त्यामुळे जास्तीत जास्त सूर्यप्रकाश पॅनेलवर पडून ऊर्जा निर्मिती वाढते.या रोबोटमध्ये सेन्सर्स आणि मोटर यंत्रणांचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे तो मोठ्या क्षमतेच्या व रिमोट सोलर प्रकल्पांसाठी उपयुक्त ठरतो. यामुळे वेळ आणि मनुष्यबळाची बचत होते, तसेच नवीकरणीय (रिन्यूएबल) ऊर्जा उपक्रमांना चालना मिळते.प्रोजेक्ट प्रात्यक्षिकाच्या वेळी (व्हाईस चेअर, एएसएम इंडिया नॅशनल कौन्सिल) तसेच सुबोध मटेरियल टेक्नॉलॉजीस्ट, मुंबई चे संचालक सुधाकर बोंडे तसेच सोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील आणि यांत्रिक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. तुषार ए. कोळी उपस्थीत होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करताना, त्यांनी विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्याचे आणि कल्पकतेमूळे अशा नाविन्यपूर्ण प्रकल्पांमुळे टिकाऊ ऊर्जा उपाययोजनांना हातभार लागतो, असे मत व्यक्त केले.
या प्रकल्पामुळे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे इनोवेशन चे विचार व व्यावहारिक तांत्रिक कौशल्य समोर आले आहे. तसेच, भारतात स्वच्छ आणि कार्यक्षम सौरऊर्जा उपाययोजनांच्या गरजेला उत्तर देण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होऊ शकतो.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य) डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.