आर्थिकजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रशासकीयसमस्या

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त मान्यवरांनी केले मार्गदर्शन

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तहसिल कार्यालयातर्फे आज दि. 2४ डिसेंबर रोजी पत्रकार भवन येथे ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन पुरवठा निरीक्षक रंजना बहादे यांनी केले.

या प्रसंगी राजस कोतवाल (माजी सदस्य, राज्यस्तरीय ग्राहक संरक्षण परिषद मंत्रालय, मुंबई) यांनी ग्राहक दिनाचे महत्व विषद करून संघटीत ग्राहक काळाची गरज असून ग्राहकांनी संघटीत होऊन होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध लढा द्यावा, असे आवाहन केले. तसेच डिजीटल प्रणालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे बांधकाम व्यवसायाकाकडून ग्राहकांना प्लॅट विकले जातात. परंतू जागेचा उतारा त्यांच्या नावावरच ठेवला जातो. त्यामुळे भविष्यात त्या अपार्टमेंटला रिडेव्हलेपमेंट करायची वेळ आल्यास उतार त्यांच्या नावावर नसल्याने त्यांना अडचण येते. उतारा जमिन मालकाच्या नावावर असल्याने तो देण्यास टाळाटाळ करतो. जळगावात बऱ्याच ठिकाणी असे प्रकार घडलेले आहेत. त्यासाठी प्रशासनाने या बाबीकडे लक्ष द्यावे, असे आवाहनहि त्यांनी यावेळी केले.

या प्रसंगी ॲड. मंजूळा यांनी ग्राहकांनी जनजागृती करून ग्राहक चळवळ राबवावी, असे सांगून कायदेशीर बाबींची बरीच माहिती देऊन सक्षम ग्राहक बनावे, असे आवाहन केले. याप्रसंगी दूध विकास फेडरेशनचे श्री बिरेद्रसिंग, श्री सुर्यवंशी, वजन माप विभागाचे श्री जाधव, फूड व ड्रग विभागाचे दिनानाथ शिंदे, श्री प्रशांत अस्वार, श्रीमती दिपाली राजपूत, प्रियंका देसले, नारायण सोनवणे उपस्थित होते. आभार प्रदर्शन दिपाली राजपूत यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button