आरोग्यजळगावताज्या बातम्यासामाजिक

रोटरी क्लब जळगाव सेंट्रलतर्फे ब्लॅंकेट, स्वेटर, कानटोपीचे वितरण

जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे सिव्हिल हॉस्पिटल येथे गरजू रुग्ण व व्यक्तींना ब्लॅंकेट, स्वेटर, कानटोपी याचे वितरण करण्यात आले. सध्या थंडीचे प्रमाण प्रचंड वाढलेले असल्यामुळे गरजू व्यक्तींना त्यापासून संरक्षण मिळावे व त्यांचे आरोग्य चांगले राहावे या सामाजिक भावनेतून रोटरी सेंट्रलतर्फे हा उपक्रम राबविण्यात आल्याचे अध्यक्ष जितेंद्र बरडे यांनी सांगितले.

याप्रसंगी रोटरी सेंट्रलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नरेंद्र जैन, माजी अध्यक्ष डॉ.राहुल मयूर, विपुल पारेख, प्रकल्प प्रमुख कल्पेश दोशी, मानद सचिव ॲड.केतन ढाके, महेंद्र गांधी, समर्थसिंग पाटील, शामलाल कुकरेजा यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी रोटरी सेंट्रलचे मिलन मेहता, हरीश ठक्कर, निलेश सुरतवाला, सुनील बाफना, महेश गदोडिया, अमित अग्रवाल, शामकांत वाणी, मनोज पाटील, जतिन ओझा, ललित मल्हारा, डॉ. चंद्रकांत साळुंखे यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button