जळगावताज्या बातम्यानिवडणूक

अमळनेर नगरपरिषदेच्या अटीतटीच्या लढतीत डॉ. परिक्षीत श्रीराम बाविस्कर विजयी!

जळगाव (प्रतिनिधी) : अमळनेर येथे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या अमळनेर नगरपरिषदेचा रणसंग्राम अखेर शांत झाला असून, मतदारांनी आपला स्पष्ट कौल दिला आहे. नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत डॉ. परिक्षीत श्रीराम बाविस्कर यांनी ३०,८५६ मते मिळवत ८,६४८ मतांच्या मोठ्या फरकाने दिमाखदार विजय संपादन केला आहे. एकूण ३६ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. मात्र, अपक्ष आणि शहर विकास आघाडीने मुसंडी मारल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

या निवडणुकीत शहर विकास आघाडीने ११ जागा जिंकून आपले अस्तित्व सिद्ध केले आहे, तर आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखालील गटाला (धनुष्यबाण + पुरस्कृत) एकूण १२ जागा मिळाल्या आहेत. मात्र, सर्वाधिक १२ जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आल्याने पालिकेची सत्ता स्थापन करताना या अपक्ष नगरसेवकांची भूमिका कळीची ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. डॉ. परिक्षीत बाविस्कर यांच्या विजयामुळे शहरात उत्साहाचे वातावरण असून, आता नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगराध्यक्ष शहराच्या विकासाला कशी गती देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमळनेर नगरपरिषद निकाल २०२५ पक्षीय बलाबल
• एकूण जागा : ३६
• शहर विकास आघाडी – ११
• शिरीष चौधरी (धनुष्यबाण) – १०
• शिरीष चौधरी पुरस्कृत उमेदवार – ०२
• राष्ट्रवादी (शरद पवार गट – तुतारी) – ०१
• अपक्ष – १२

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button