आरोग्यअभिवादनक्रीडाजळगावताज्या बातम्या

खेळातून निर्माण होते सांघिक भावना, खिलाडूवृत्ती जिवंत ठेवा : उद्योजक अशोक जैन

जळगावात ‘जेपीएल-१२’चा दिमाखदार शुभारंभ; श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) : कुठलाही खेळ खेळताना सांघिक भावना ठेवली पाहिजे. तसेच खिलाडूवृत्ती जिवंत असली पाहिजे, तेव्हाच मने जिंकता येतात असे प्रतिपादन उद्योजक अशोक जैन यांनी केले. श्री जैन युवा फाउंडेशन, जळगाव आयोजित बहुप्रतिक्षित ‘जेपीएल-१२’ क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा १८ डिसेंबर रोजी रात्री जी.एस. ग्राउंड (शिवतीर्थ) येथे अत्यंत उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी अशोक जैन हे बोलत होते.

या शानदार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून नयनतारा बाफना, आ.राजुमामा भोळे, माजी आ. मनीष जैन, व्यापारी अनिल व संजय देसर्डा, विजय बनवट आणि सिद्धार्थ बाफना यांची उपस्थिती लाभली. सर्व टीम मालक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे बिगुल वाजले. कार्यक्रमाची सुरुवात ‘नवकार मंत्र’ पठणाने करण्यात आली. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण नियोजनाची धुरा महिलांनी यशस्वीपणे सांभाळली होती. जैन युवा फाउंडेशनच्या बालचमूंनी सादर केलेल्या ‘गणेश वंदने’ने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर स्वाती जैन, प्रिया बांठिया, सलोनी ललवानी आणि श्रुति राका यांनी सादर केलेल्या सुश्राव्य भजनांनी कार्यक्रमात रंगत आणली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतना ललवानी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट चेअरमन रिकेश गांधी, सपना छोरिया आणि दीपा राका यांनी विशेष परिश्रम घेतले. क्रिकेट रसिकांसाठी या स्पर्धेचे ‘लाइव्ह व्हिजन’ या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपण देखील केले जात आहे.

मंचावरील सर्व अतिथींचे स्वागत आणि आभार ऋषभ शाह यांनी मानले. श्री जैन युवा फाउंडेशनचे अध्यक्ष रितेश छोरिया, प्रोजेक्ट चेअरमन रिकेश गांधी, अनिल सिसोदिया व सर्व सदस्यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि सहकार्य करणाऱ्यांचे ऋण व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button