
जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलने केशव स्मृती प्रतिष्ठान संचालित सावखेडा शिवारातील आश्रय माझे घर या प्रकल्पाला दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या वस्तू देणगी स्वरूपात देऊन मदतीचा हात दिला.
या प्रकल्पात १८ वर्षावरील बौद्धिक दिव्यांग व्यक्तींची काळजीपूर्वक सेवा करण्यात येते. या व्यक्तींसाठी रोटरी सेंट्रल तर्फे २ मोठे कपाट, ४० ब्लॅंकेट, ४० टॉवेल, ३० किलो साखर, ५ किलो चहा पावडर, टूथपेस्ट, टूथब्रश, साबण हे साहित्य प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे ( नाशिक) यांच्या हस्ते संस्थेच्या रेखा पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
याप्रसंगी रोटरी सेंट्रलचे माजी अध्यक्ष महेंद्र रायसोनी, प्रकल्प प्रमुख डॉ.अपर्णा भट – कासार, अध्यक्ष जितेंद्र बरडे, आयपीपी दिनेश थोरात, साधना दामले, महेंद्र गांधी, विलास देशमुख, अजय चूघरा, यशपाल मंत्री, प्रवीण बोथरा यांची प्रमुख उपस्थिती होती.




