
स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात बंद घरातील सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ४९६००/- रु चा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली होती. हा घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला असून याप्रकरणी चोरीच्या मुद्देमालासह २ संशयित आरोपीना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिम कॉलनी येथील शरीफ मुराद खाटिक हे दि.१३ रोजी चाळीसगांव येथे लग्न समारंभाकरीता गेले असता त्यांचे घराचे कडी कोंडा तोडुन अज्ञात चोरट्याने घरातील सोन्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ४९६००/- रु चा मुद्देमाल चोरुन नेल्याबाबत तक्रार दिल्याने एमआयडीसी पो.स्टे येथे अज्ञात इसमाविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर घरफोडी ही अभिलेखावरील गुन्हेगार शकील शेख ताजुद्दीन शेख ऊर्फ बंदर (रा. कासमवाडी ), साहिल शहा सद्दाम शहा ऊर्फ काल्या (रा. तांबापुरा) यांनी केली असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवा यांना मिळाली. त्याप्रमाणे कासमावडी परिसरातुन दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांना एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोहेकॉ किरण चौधरी हे करीत आहेत.
यांनी केली कारवाई
दोन्ही आरोपी मजकुर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांचेवर यापुर्वी घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फैजदार अतुल वंजारी, पोहेकॉ अक्रम शेख, विजय पाटील, पोना किशोर पाटील, पोकॉ राहुल रगडे, रविंद्र कापडण, गोपाल पाटील यांनी केली आहे.




