
एमआयडीसी पोलिसांची कारवाई, ८३ हजारांची रोकड हस्तगत
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शेरा चौकात दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ८३ हजारांची रोकड चोरून नेणाऱ्या तिन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी गोपनिय माहिती आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अटक केली आहे. ऋषीकेश अजय तेली, रोहित गुरूदयाला बघेल आणि अनुज ईश्वर सोनवणे (सर्व रा. दत्त नगर, मेहरूण) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून तिघांकडून चोरीला गेलेली ८३ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनीत दिपक गगराडे हे १० डिसेंबर रोजी त्यांचे दुकान बंद घर घराकडे निघाले होते. त्यावेळी रस्त्यावरील मेडीकल दुकानातून औषधी घेण्यासाठी त्यांनी दुचाकी रस्त्यावर लावून दुकानात केले. त्यावेळी त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून ८३ हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनिय माहिती आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे संशयित चोरट्यांची ओळख पटविण्यात आली. त्यानुसार पोलीसांनी शुक्रवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता दत्त नगरात सापळा रचून संशयित आरोपी ऋषीकेश अजय तेली, रोहित गुरूदयाला बघेल आणि अनुज ईश्वर सोनवणे सर्व रा. दत्त नगर, मेहरूण जळगाव यांना अटक करण्यात आली., त्यांच्याकडून चोरीला गेलेले ८३ हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहूल तायडे, चंद्रकांत धनके, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी, पो.कॉ. नितीन ठाकूर, किरण पाटील, गणेश ठाकरे, राहूल घेटे, नरेंद्र मोरे यांनी केली आहे.




