आरोग्यजळगावताज्या बातम्याशासकीयसामाजिक

पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन

शिबिरात 30 पोलीस अंमलदारांनी स्वेच्छेने केले रक्तदान

जळगाव (प्रतिनिधी) : पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले. पोलीस मुख्यालय येथे दि. 13 रोजी सकाळी आयोजित या शिबिरात 30 पोलीस अंमलदार यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.

रक्तदानाकरीता पोलीस मुख्यालय, जळगाव, जिल्हा विशेष शाखा, जळगाव स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव, नियत्रण कक्ष, जळगाव तसेच जळगाव शहरातील पोलीस स्टेशन मधील पोलीस अंमलदार हजर होते. यावेळी पोलीस दलाकडील सुमारे 30 पोलीस अंमलदार यांनी स्वेच्छेने रक्तदान केल्याच्या सन्मानार्थ त्यांना राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक (गृह) अरुण आव्हाड, राखीव पोलीस उपनिरीक्षक सचिन चिवंडे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. दिपक शेजवळ (पॅथालॉजी विभाग प्रमुख), डॉ. कविता पाटील (रक्तकेंद्र प्रमुख), डॉ. कृणाल देवरे, डॉ. श्रुती उमाळे, डॉ. श्रध्दा गायगोळ, तंत्रज्ञ लक्ष्मीकांत त्रिपाठी, दिपक होनमाने, रेहान शेख, समाजसेवक अधीक्षक प्रदीप पाडवी, परिचारक प्रफुल्ल कुवर, परिचर रोहीत बाविस्कर उपस्थित होते.

रक्तदान शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचायांसह पोलीस दलाकडील राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार, राखीव पोलीस उपनिरीक्षक सचिन चिवंडे, पोहेकॉ जयवंत चौधरी, स. फौ. शामकांत पाटील, संभाजी पाटील, नरेंद्र वारुळे, किरण गायकवाड, रज्जाक सैय्यद, समाधान सिहंले, सुभाष धिरबस्ती, किरण सपकाळे, संदीप पाटील, सचिन पाटील, अरुण पाटील, दिपक चौधरी, गजानन फुसे यांनी परीश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button