
रावेर, (प्रतिनिधी) : स्वामी एज्युकेशनल ग्रुप अंतर्गत चालणारी स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर, रावेर मधील मृदुला संजीव पाटील इयत्ता ५ वी हिने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्ह्यातून गुणवत्ता यादीत २३६ क्रमांक मिळवला.
विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.यशाबद्दल तिचे संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पवार, सचिव पवार यांनी कौतुक करून अभिनंदन केले. तसेच प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका हिरकणी धांडे, माध्यमिक विभाग मुख्याध्यापक राजू पवार, पर्यवेक्षिका कीर्ती निळे यांनीही या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले आहे.
मृदुला पाटील हिचे अविनाश पाटील, समीर तडवी, गजानन धनगर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.