आरोग्यआर्थिकजळगावताज्या बातम्यापर्यावरणमहाराष्ट्रयोजनाशासकीय

पी. एम. सूर्य घर योजनेचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यानी लाभ घ्यावा

अधीक्षक अभियंता व प्रकल्प अधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) : गरीब व सर्वसामान्य कुटुंबांना सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी पी. एम. सूर्य घर योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात ११ डिसेंबर रोजी महत्वाची बैठक घेण्यात आली.

ही बैठक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. महावितरणचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस सर्व सोलर वितरक तसेच रुरल हाऊसिंग इंजिनिअर उपस्थित होते. बैठकीत योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड, सोलर इंस्टॉलेशनची गुणवत्ता, वेळेवर काम पूर्ण करणे, लाभार्थ्यांना सुलभ सेवा देणे, तसेच सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढविणे या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

यावेळी कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, यासाठी सर्व वितरक व अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनीही या योजनेमुळे नागरिकांना दीर्घकालीन ऊर्जाबचत व आर्थिक फायदा होणार असल्याचे सांगत व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली व संबंधित विभागांच्या समन्वयातून जळगाव जिल्ह्यात पी. एम. सूर्य घर योजना यशस्वीपणे राबविण्याचा संकल्प या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button