आरोग्यअभिवादनआर्थिकजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रयोजनाशासकीय

जिल्हा परिषदमध्ये विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आढावा बैठक

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या विविध विभाग प्रमुख तसेच सर्व गटविकास अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज संपन्न झाली. जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना तसेच राज्य पातळीवरील उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी तसेच सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. बैठकीत प्रत्येक विभागाने राबविण्यात येत असलेल्या योजनांची सद्यस्थिती, अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी तसेच आगामी कार्ययोजनांबाबत सविस्तर माहिती सादर केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. योजनांची अंमलबजावणी परिणामकारक, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने होण्यासाठी प्रत्येक विभागाने समन्वय व गती वाढवावी.”

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमित फॉलोअप, विभागांमधील परस्पर सहकार्य आणि जबाबदारीची भावना वाढवून काम करण्यावर त्यांनी भर दिला. जिल्ह्यातील विकासकामे आणि जनकल्याणकारी उपक्रम वेगाने पूर्ण करून लोकांचा विश्वास जिंकणे हीच सर्वांची प्राथमिकता असावी, असेही त्या म्हणाल्या. बैठकीत सर्व विभाग प्रमुखांनी सुचना, प्रगती अहवाल आणि योजनांच्या गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीबाबत चर्चा करून पुढील मार्गनिश्चिती करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button