आरोग्यअभिवादनऐतिहासिकजळगावताज्या बातम्यानिवडपर्यावरणपुरस्कारमहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशेतकरीशैक्षणिक

उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. विनोद भागवत निवड

विविध गौरव पुरस्कारांची घोषणा

जळगाव (प्रतिनिधी) : चातक निसर्ग संवर्धन संस्था आणि वन्यजीव विभाग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचवे उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन दि. 27 व 28 डिसेंबर रोजी दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्था, पाल (ता. रावेर, जि. जळगाव) येथे होणार आहे. या भव्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. विनोद भागवत (धुळे) यांची निवड करण्यात आली आहे. तसेच संमेलनातील विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

डॉ. भागवत गेल्या १५ वर्षांपासून पक्षीनिरीक्षण, सर्वेक्षण आणि पक्षी-अभ्यास या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. ते उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे क्रियाशील संस्थापक सदस्य असून पक्षीसंवर्धनासाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे.

संमेलनातील पुरस्कारांची घोषणा
या संमेलनादरम्यान खालील प्रतिष्ठित पुरस्कारांनी मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. अनिल माळी पुरस्कृत “पक्षी जनजागृती पुरस्कार” – पुरस्कृत: अश्विन पाटील, अमळनेर, न्यू कॉन्झरवर पुरस्कृत “महिला पक्षी अभ्यासक पुरस्कार” – पुरस्कृत: डॉ. चंचल शहा, जळगाव, डॉ. सुधाकर कुऱ्हाडे पुरस्कृत “युवा पक्षी मित्र पुरस्कार” – पुरस्कृत: राहुल सोनवणे, जळगाव या सर्व पुरस्कारांचे स्वरूप रोख ₹. १५५१ व सन्मानपत्र असे आहे.

संमेलनात २०० पेक्षा अधिक पक्षीमित्र सहभागी होणार
संमेलनाचे उद्घाटन जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, वनसंरक्षक, नाशिक वन्यजीव विभाग कृष्णा भवर, उपवनसंरक्षक जमीर शेख, राम धोत्रे, वन प्रशिक्षण केंद्राचे संचालक हेमंत शेवाळे, दिपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजेश मोराळे, मुख्य अभियंता औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर यांची उपस्थिती असेल. संपूर्ण महाराष्ट्रातून २०० पेक्षा अधिक पक्षीमित्र, अभ्यासक व संशोधक सहभागी होणार अशी अपेक्षा आहे.

संमेलनाची मुख्य थीम व कार्यक्रम
या वर्षीची संमेलन-थीम “पाणथळ अधिवास आणि पाणथळावरील पक्षी – संरक्षण आणि संवर्धन” ही असून या विषयावर तज्ज्ञांचे व्याख्यान, मार्गदर्शन, स्लाइड शो आदी आकर्षक सत्रांचे आयोजन केले आहे. तसेच सहभागींसाठी जंगल सफारी, कॅम्प फायर, आदिवासी नृत्य, खानदेशी स्वादिष्ट भोजन अशा भरगच्च मेजवानी चा आस्वाद घेता येणार आहे, अशी माहिती संमेलन समन्वयक विलास महाजन आणि सचिव चौधरी यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button