
रावेरच्या स्वामी इंग्लिश मीडियम स्कूलची शालेय यशाची तेजस्वी कामगिरी
रावेर, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या २०२५ मध्ये स्वामी इंग्लिश मीडियम स्कूल, रावेर येथील विद्यार्थिनी संस्कृती चंद्रकांत राऊत हिने तालुकास्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत मेरिट लिस्टमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ही अत्यंत गौरवाची बाब असून संस्कृतीच्या या यशाने संपूर्ण शाळेचा अभिमान वाढवला आहे. तिच्या यशाचे श्रेय तिच्या मेहनतीला, पालकांच्या पाठबळाला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला जाते.
संस्कृतीचे यश हे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. शाळेचे अध्यक्ष रवींद्र पवार, सचिव मनीषा पवार, संचालिका डॉ. सुखदा पवार यांनी तिचे व तिच्या कुटुंबियांचे अभिनंदन करून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.