
रावेर (प्रतिनिधी) : रावेर येथील मॅक्रो व्हिजन अकॅडमीमध्ये TALLENTEXT परीक्षा यशस्वीरीत्या आयोजित करून त्यात उत्तम निकाल दिल्यामुळे शाळेचे सचिव स्वप्नील पाटील यांचा ALLEN INDORE तर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या परीक्षेमध्ये शाळेतील इयत्ता 5 वी ते 10 च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या उपक्रमासाठी शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे व मुख्याध्यापक जनार्दन धनगर आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीक्षेच्या यशस्वितेसाठी मेहनत घेतली. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा या परीक्षेमागील हेतू आहे, असे मत शाळेचे सचिव स्वप्नील पाटील यांनी व्यक्त केले.
शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी या यशाबद्दल सर्वांचे कौतुक करत आनंद व्यक्त केला आहे. तसेच शाळेचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले, डायरेक्टर विनायक पाटील, धनराज चौधरी यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.




