आरोग्यअभिवादनक्रीडाजळगावताज्या बातम्यानिवडशैक्षणिक

मॅक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर येथे “तारांगण कार्यक्रम” उत्साहात

रावेर (प्रतिनिधी) : येथील मॅक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर येथे पोलाद स्टिल जालना आणि दिशा ट्रेडर्स रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने कॉस्मीक कॅलिडोस्कोप या कार्यक्रमाचे दिनांक ८ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमात चंद्र, तारे, ग्रह आणि आकाश गंगे शी निगडीत विविध बाबींची माहिती थ्रीडी अॅनिमेशनस्वरुपात उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांना मिळाली. या उपक्रमासाठी शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे व मुख्याध्यापक जनार्दन धनगर उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा बौद्धिक तसेच सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने शाळेत अशा कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने केले जाते.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानवृद्धी आणि आत्मविश्वास वाढण्यास निश्चितच चालना मिळाली. शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी या कार्यक्रमा बद्दल सर्वांचे कौतुक करत आनंद व्यक्त केला आहे. तसेच शाळेचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले, डायरेक्टर विनायक पाटील, धनराज चौधरी यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button