आरोग्यकलाकारजळगावताज्या बातम्यानिवडपुरस्कारमहाराष्ट्रशैक्षणिक

बेंडाळे महाविद्यालयाच्या दिपाली सोनी यांची महाराष्ट्र राज्य युवा महोत्सवासाठी निवड

जळगाव (प्रतिनिधी) : धुळे येथे दि.५ डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि क्रीडा व युवक सेवा विभाग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक विभागीय युवा महोत्सवात डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय(स्वायत्त) जळगाव ची विद्यार्थिनी दीपाली विनोद सोनी (तृतीय वर्ष कला) हिला वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक (रोख रक्कम व सन्मानचिन्ह) प्राप्त झाले.

तसेच महाराष्ट्र राज्य युवा महोत्सवासाठी तिची निवड करण्यात आली. यासाठी वाड्.मय मंडळ प्रमुख प्रा.दीपक पवार, राज्यशास्त्र विभागाचे प्रा.शांताराम तायडे, प्रा. अमृता नेतकर आणि प्रा.कल्पना खेडकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यार्थिनीचे प्राचार्य डॉ.व्ही.जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. पी. एन.तायडे, उपप्राचार्य डॉ.सत्यजित साळवे आणि कला मंडळ प्रमुख डॉ. अनिता कोल्हे यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button