अभिवादनआरोग्यजळगावताज्या बातम्याराजकारणसामाजिक

शिंपी समाज बांधवांची खाणे सुमारी करण्याच्या फॉर्मचे विमोचन

जळगाव (प्रतिनिधी) : श्री क्षत्रिय शिंपी समाधीत वर्धक संस्था संचलित सहयोगी संस्था व शाखांची संयुक्त बैठक आज शिंपी समाजाच्या श्रीमती मनोरमाबाई जगताप कला सांस्कृतिक सभागृह येथे सकाळी १० वाजता समाजाध्यक्ष विवेक जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहरातील 20000 समाज बांधवांची खाणे सुमारी करण्याच्या फार्मचे विमोचन करण्यात आले.

बैठकीमध्ये येणाऱ्या अ.भा. शिंपी समाज अधिवेशना विषयी जळगाव शहरातून अध्यक्ष पदासाठी उमेदवार देणे तसेच आगामी जळगाव शहर महानगरपालिकेत समाजातील इच्छुक उमेदवारांना समाजाचे समर्थन करून सत्ताधारी पक्षाकडे समाजातील इच्छुक बांधवांसाठी मागणी करणे तसेच संपूर्ण शहरातील 20000 समाज बांधवांची खाणे सुमारी करण्याच्या फार्मचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाजाध्यक्ष विवेक जगताप, कार्याध्यक्ष मनोज भांडारकर, उपाध्यक्ष दिलीप सोनवणे, सचिव अनिल खैरनार ,कोषाध्यक्ष चेतन खैरनार, माजी अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे, अ भा सहसचिव संजय जगताप, पिंप्राळा संस्था अध्यक्ष ऋषिकेश शिंपी, नाम संस्कार फाउंडेशन उपाध्यक्ष कुणाल बागुल, स्वयंस्फूर्त संस्था उपाध्यक्ष जितेंद्र हितवर्धक संस्था सहसचिव दीपक जगताप, वसतिगृह प्रमुख प्रदीप शिंपी, प्रसिद्धी प्रमुख गणेश सोनवणे, महिला अध्यक्षा माधुरी शिंपी युवक अध्यक्ष हेमंत शिंपी आदी उपस्थित होते.

या प्रसंगी सर्व संस्थांचे पदाधिकारी यांनी आपापले मत व्यक्त करून अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेसाठी जळगाव शहरातून एकजूट व एकरूप होऊन समाज संघटन दाखवण्याचे ठरले तसेच तसेज आगामी जळगाव महानगरपालिके निवडणुकीमध्ये शिंपी समाजाचा प्रतिनिधित्व सुद्धा महापालिकेत असावं असा ठराव सर्वानुमते करण्यात आला व सत्ताधारी व इतर पक्षातून समाजातील इच्छुक उमेदवारांना पाठिंबा देऊन निवडून आणण्याचा निर्धार याप्रसंगी सर्वानुमते करण्यात आला. बैठकीला संस्थेचे सदस्य जळगाव शहरातील पिंप्राळा शिंपी समाज संस्था संत नामदेव नाम संस्कार फौंडेशन मेहरूण ,स्वयंस्फूर्त शिंपी समाज बहुउद्देशीय संस्था दादावाडी, या संस्थेचे प्रतिनिधी तसेच हितवर्धक संस्थेचे शाखाध्यक्ष युवक महिला व समाज बांधव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button