क्राईमजळगावताज्या बातम्याशासकीय

दुचाकीचोर निघाला गॅरेज मेकॅनिक!

एलसीबीच्या कारवाईत एकाला अटक!

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात होणाऱ्या दुचाकी चोरी प्रकरणी जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानिया पार्क येथून एका गॅरेज मॅकेनिकला जेरबंद केले आहे. त्याने चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी याच्याकडून चोरी केलेल्या चारपैकी तीन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानिया पार्क, शिवाजी नगर येथील रहिवासी असलेला माजिदअली लियाकतअली हा गॅरेज मेकॅनिकचे काम करत असून, तो गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरण्याचे गुन्हे करत आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी ६ डिसेंबर रोजी रात्री संशयित आरोपी माजितद अली लियाकत अली याला उस्मानिया पार्क परिसरातून अटक केली आहे. त्याने जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणांहून चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

धुळेसह जळगावहून दुचाकीची चोरी
माजिदअली याने ४ एप्रिल रोजी धुळे सायकल मार्टजवळून (सरताज कलीम मणियार यांची MH १९ DK ११७६), तसेच २९ नोव्हेंबर आणि २३ नोव्हेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातून दोन वेगवेगळ्या दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. आरोपीला दुचाकी दुरुस्तीचे ज्ञान असल्यामुळे तो सहजपणे चोरी करत होता.

यांनी केली कारवाई
पोलिसांनी माजिदअली याच्याकडून चोरी केलेल्या चारपैकी तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी आरोपीला जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, पोना प्रदीप पाटील पुढील तपास करीत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या टीमने यशस्वीपणे पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button