अभिवादनआरोग्यआर्थिकजळगावताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही सर्वांच्याच फायद्याची – अनिल कुमार प्रीतम

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना व गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चा

जळगाव (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही सर्वांच्याच फायद्याची, असे मत अनिल कुमार प्रीतम यांनी व्यक्त केले. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना जळगाव व गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने ५ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना व एम्पलोयी एनरोलमेंट कॅम्पेन २०२५ या विषयावरील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून नाशिक रीजनचे रिजनल कमिशनर अनिल कुमार प्रीतम हे बोलत होते.

व्यासपीठावर जळगाव जिल्ह्याचे भविष्य निर्वाह निधी संघटनेचे असिस्टंट कमिशनर के के कुंभार इन्स्पेक्टर, दीपक चौधरी तसेच परिसंस्थेचे संचालक डॉ प्रशांत वारके हे उपस्थित होते. कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील सुमारे १२० उद्योग क्षेत्रातील उद्योजक व अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन भूमिका नाले यांनी केले.

अनिल कुमार प्रीतम यांनी आपल्या भाषणात योजनेच्या काही महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या. पहिल्यांदाच काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी इपीएफओ मध्ये नोंदणीकृत असे पहिल्यांदाच काम करणारे कर्मचारी ज्यांचे मासिक पगार एक लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना १५,००० पर्यंतचे एक महिन्याचे वेतन दोन हप्त्यांमध्ये दिले जाईल. पहिले हप्ता ६ महिन्यांच्या सलग सेवेनंतर आणि दुसरे हप्ता १२ महिन्यांच्या सेवेनंतर, ज्यावेळी कर्मचारी आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण करतो.या प्रोत्साहनाचा एक भाग बचत खात्यात (सेव्हिंग / डिपॉझिट अकाउंट) ठेवला जाईल, जेणेकरून बचतीची सवय वाढेल. कर्मचार्यांसाठी हे आधार-बेस्ड पेमेंट पद्धतने केले जाईल, तर नियोक्त्यांसाठी पेमेंट लिंक खात्यांमध्ये होईल या योजनेचा फायदा उद्योग-नियोक्त्यांसाठी तसेच युवा कर्मचार्‍यांसाठी कसा होईल हे स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button