अभिवादनजळगावताज्या बातम्याशैक्षणिक

गोदावरी कृषी संकुल परिसरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

जळगाव (प्रतिनिधी) : डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव. येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न,विश्वभूषण, बोधिसत्व, योग पुरुष, अर्थतज्ञ,अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती डॉ.ए.पी. चौधरी (संशोधन संचालक) प्रशासकीय अधिकारी श्री मोहन सूर्यवंशी, कृषी महाविद्यालय मुक्ताईनगर येथिल डॉ. सागर पाटील, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शैलेश तायडे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सपकाळे व तसेच कृषी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रवीण देवरे राष्ट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम समनव्यक प्रा. आर डी. चौधरी, विध्यार्थी व तीनही महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व आदरांजली वाहिनीयतआले व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सपकाळे यांनी त्रिशरण व पंचशील घेऊन कार्यक्रम चे सुरुवात केले. व डॉ. शैलेश तायडे यांनी महापुरुषाच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकले आणि त्यांच्या प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण विभागातील प्रा. गोणशेटवाड बी. एम. यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. कार्तिक खर्चे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button