अभिवादनजळगावताज्या बातम्याशैक्षणिक

डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…!

जळगाव (प्रतिनिधी) : येथील डॉ.अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.व्ही.जे.पाटील होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रा.एस.टी.ठाकूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व कर्तुत्व मनोगतातून व्यक्त केले.तसेच विद्यार्थिनींना संविधानाचे महत्त्व, भारतीय संविधानाची उपयुक्तता सांगून भारतीय संविधान प्रत्येकाने आपल्या कार्यातून अंगीकारणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ.आंबेडकरांच्या त्याग आणि दूरदृष्टीचे स्मरण करत, सामाजिक समता, न्याय, शिक्षण आणि संघटन या मूल्यांवर आधारित बाबासाहेबांच्या विचार व कार्याची महत्वपूर्ण माहिती दिली.

कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.सत्यजित साळवे,डॉ.पी. एन. तायडे उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार डॉ. विनोद नन्नवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ.हर्षाली पाटील, डॉ. मोनाली खाचणे, प्रा. नुरी तडवी तसेच प्राध्यापक बंधू -भगिनी व विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button